उरण मध्ये कॉग्रेसच्या महेंद्र घरत आणि आमदार महेश बालदी यांच्यात होणार काटे की टक्कर...

 उरण मध्ये कॉग्रेसच्या महेंद्र घरत आणि आमदार महेश बालदी यांच्यात होणार काटे की टक्कर...

उमेदवारी जवळ निश्चित,महाविकास आघाडीतुन महेंद्र घरतच देऊ शकतात भाजपला तगडे आव्हान....
  

पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २५ सप्टेंबर,

              उरण विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतुन महेंद्र घरत यांना उमेदवारी द्यावी, कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरतच भाजपला तगडे आव्हान देऊन महायुतीला रोखू शकतात अशी माहिती  कॉग्रेसचे जीर्ण व चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक शंकर पाटील यांनी दिली आहे.


              उरण विधानसभा मतदार संघात  काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत भाजपचे आमदार महेश बालदी यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचे जवळ पास निश्चित झाले झाले आहे, या मतदार संघात भाजपची ताकद मोठया प्रमाणात आहे.महायुतीला रोखायचे  असल्यास  महाविकास आघाडीतुन तगडा उमेदवार देण्याचे आव्हान महाविकास आघाडी समोर असून कॉग्रेसचे महेंद्र घरतच त्यांना तगडे आव्हान देऊ शकतात, त्यांची या मतदार संघावर मजबूत पकड असून त्यांचा कामगार क्षेत्रातही मोठा दबदबा आहे याचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
           

  त्यांना  महाविकास आघाडीतून जवळपास  उमेदवारी  निश्चित झाली असून त्यांना उमेदवारी मिळाली तर ते या मतदार संघावर  महाविकास आघाडीचा नक्कीच झेंडा फडकवतील अशी माहिती जीर्ण व चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक शंकर पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर