महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ खालापूरच्या वतीने केंद्रप्रमुखपदी बढती झालेल्यांचा सन्मान
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २ सप्टेंबर,
नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषद केंद्रप्रमुख भरती प्रक्रियेत खालापूर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचा वाटा असणाऱ्या आदर्श शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी बढती दिल्याबद्दल खालापूर शिक्षक संघाच्यावतीने.,जयंत पाटील (केंद्रप्रमुख आत्करगाव) ,संतोष पाटील (केंद्रप्रमुख कारगाव) यांना सन्मानित करण्यात आले.
शिक्षक संघ खालापूरचे अध्यक्ष .संदिप जाधव यांनी पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा देताना खालापूर तालुक्याचा शैक्षणिक विकास करण्याच्या हेतूने प्रयत्नशील राहण्याबाबत सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शसचिन कडू,जगदीश मोहने,तालुका कार्याध्यक्ष मारुती दासरे,सहसरचिटणीस बळीराम चव्हाण प्रसिद्धी प्रमुख राम बिरादार,तालुका उपाध्यक्ष संदिप पाटील आदींसह धनाजी थिटे,नारायण गाडे शशिकांत फणसे, सुभाष झावरे,श्री.संजय जाधव,श्री.राजकुमार केंद्रे, विशाल गावडे, शिवाजी पावडे संजय चव्हाण, ,दादासाहेब मुंजाळ,सुधीर घोडके,रमेश चारवाडिकर,सुभाष झावरे,संजय चव्हाण सह मोठ्या संख्येने गुरुवर्य उपस्थित होते.
0 Comments