बायफ संस्था कडून सोनारवाडी शेतक-यांस बियाणे,औषधे,औजारे,सोलर पंप वाटप

 बायफ संस्था कडून सोनारवाडी  शेतक-यांस बियाणे,औषधे,औजारे,सोलर पंप वाटप 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ६ सप्टेंबर,

             जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा यांस शेतीच्या कामात अर्थिक बळ मिळावे,शेताच्या बांधावर,माळरान हे ओसाड दिसू नये हे सातत्याने हिरवे गार दिसून या माध्यमातून अर्थिक उत्पन्न मिळावे या उद्दात विचारांतून सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे यांच्या प्रयत्नातून गेली अनेक वर्ष विविध संस्था च्या माध्यमातून योजना राबविण्यांचे काम करीत आहे.आज बायफ संस्था कडून सोनारवाडी शेतक-यांस बियाणे,औषधे,सोलर पंप,कोलपे सायकल,वजन काटा,कॅरेट वाटप करण्यांत आले.या मध्ये भाजी पाल्यांचे अनेक बियाणे देण्यांत आले.शिवाय मार्गदर्शन करण्यांत आले.
               पावसाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध असतांना त्यांचा उपयोग करुन शिवार फुलवावे या विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यांत आला.ह्या माध्यमातून हाताला काम त्याच बरोबर एक रोजगार उपलब्ध निर्माण करण्यांत आला.या लागवड केलेल्या बियाणांच्या माध्यमातून येणारी भाजी बाजार पेठेत विक्री केल्यांस अर्थिक ची कमतरता भासणार नाही या उद्दात विचारांतून हा कार्यक्रम  घेण्यांत आला. 

            हा उपक्रम हाती घेवून येथिल या शेतकरी बांधवांस मार्गदर्शन समवेत,या पासून होणारा लाभ यांचे फायदे सागण्यांत आले.त्यांच बरोबर काही समस्या निर्माण झाल्यास आपण तो सोडवून मार्गी लावणार असल्यांचे सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले यावेळी बायफ संस्था पदाधिकारी - विजय रायते,सीआरपी - भारती शिंगाडे,त्याच बरोबर पांडुरंग रामा लेंडे,वात्या लक्ष्मण लेंडे,परशुराम शनिवारऱ्या लेंडे,नाग्या श्रावण सिद,बाळ्या शनिवाऱ्या लेंडे,वात्या बुध्या सिद,काळुराम गौऱ्या दरवडा,काशिनाथ बुदया उघडा,सीताराम बाळ्या कुराडे,मंगळ्या बुद्या उघडा,मारुती गुनाजी पारधी,काळ्या बाळ्या लेंडे,अनिल चंद्रकांत शिद, तुळशी जोमा लेंडे, पांडुरंग  बाळ्या शिद,अनिल रामा शिद,चंद्रकांत शिद,दत्ता चंद्रकांत लेंडे, बेबी बाळ्या लेंडे, तुकाराम जेठ्या कुराडे, नामदेव पाक्या लेंडे, सुनील हरी पारधी, दत्तू हरी कुराडे,अनंता मुका लेंडे अदि उपस्थित होते. 

                  



Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण