धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात क्रांती करावी - प्रदेशाध्यक्ष - प्रवीण काकडे

 धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात क्रांती करावी - प्रदेशाध्यक्ष - प्रवीण काकडे 




पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ६ सप्टेंबर,

         सातारा जिल्हातील दुर्गम भागातील मोरबाग आणि पळसावडे  येथील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
           ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य वाटप करून गोर गरीब विद्यार्थ्यांना मदत केली असून, अंत्यत गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षणाचा खर्च केला जात आहे.ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचे उद्धीष्ट आहे कि बहुजन समाजातील गरीब कष्टकरी वंचिताची मुले शिकून त्यांनी शिक्षणात प्रगती करावी  जेणेकरून शिक्षणाने माणसाची प्रगती होऊन तो समाजासाठी काम  करेल या उद्देशाने ते महासंघाच्या वतीने काम करत आहेत.
          नूकताच त्यांनी सातारा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या मोरबाग आणि पळसावडे   येथील गोर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, डॉ.चेतन पाटील, डॉ.अश्विनी पाटील, कराड उत्तर अध्यक्ष सतीश थोरात, रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ कोकरे,सारिका कोकरे, कोंडीबा कोकरे, सचिन काळे, सायली जानकर, तेजस गोरे, सावित्री कोकरे, आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार