"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" उपक्रमांतर्गत राजिप शाळा वडगाव तालुक्यात प्रथम क्रमाकांचे मानकरी
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगाव : ७ सप्टेंबर,
मराठी शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडविण्यांचे काम शिक्षक करुन विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी वाढिव साठी भर दिला जात असतो.त्याच बरोबर नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून त्या ठिकाणी विविध सुख सोयी समवेत सुसज्य असे वातावरण निर्माण केले जात असते.या सर्व बाबीचा अभ्यास आणी पाहणी करुन पंचायत समिती खालापूर "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"अभियान राबविण्यांत आले.यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था.या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद वडगाव या शाळेला प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्रधान करुन तीन लाखाचा धनादेश या शाळेच्या विकासाठी देण्यांत आल्यांने या शाळेचे शिक्षकांचे कौतुक होत आहे.
राजिप शाळा वडगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्यांचे पहावयांस मिळत आहे.प्रत्येक वर्गात एलईडी,संगणक लॅब,तसेच भिंतीवर,आयसीटी पासून विज्ञानापर्यंत,गणित मराठी,इतिहास,भूगोल,नागरिकशास्त्रा,शेती,शालेय आभ्यास या भिंतीवर रंगविण्यांत आल्यांचे पहावयांस मिळत आहे.त्याच बरोबर खेळाचे मैदान, परसबाग,रीडिंग गार्डन तसेच पोषण आहारात सुद्धा विविधता पहावयांस मिळत आहे.
या ठिकाणी येणारे विविध सण साजरे केले जात असून,त्यांची माहिती सुद्धा सांगितली जाते.विद्यार्थी गैर हजर राहता नियमित शाळेत येत असतात.यामुळे विद्यार्थ्यांचा चढता आलेख येथे पहावयांस मिळत आहे.यामध्ये मुख्याध्यापक सुभाष राठोड यांचे मोठे योगदान आहे.त्याच बरोबर उप शिक्षक वैजनाथ जाधव,विषय शिक्षिका सरस्वती कवाद, पदविधर शिक्षिका मयुरी धायगुडे यांच्या सह स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर, वेदिका गडगे,भाग्यश्री तांबोळी व आकांक्षा जाधव,तसेच मा.सरपंच गौरी गडगे,महादेव गडगे,यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.शाळेला मिळालेल्या प्रथम क्रमांकाची दखल घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी सत्कार समारंभ केला.
0 Comments