वडगाव ग्रूप ग्राम पंचायत माझी वसुंधरा अभियानात ५० लाखाचे बक्षीस, पाण्यासाठी महिलांच्या डोक्यावर हंडा
पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : १० ऑक्टोबर,
पाताळगंगा परिसरातील नावलौखिक असलेली आणी रायगड जिल्ह्यात आपल्या नावांचा ठसा उमठविलेला, ग्रूप ग्राम पंचायत वडगाव नुकताच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या ५ घटकांवर आधारावर,कोकण विभागात पहिला तर राज्यात सातवा क्रमांक मिळले असून ५० लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले असल्यांचे समजते.मात्र वडगावातील महिला वर्गांस पिण्यांच्या पाण्यासाठी पायी पिट करावे लागत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा अजून उतरले नसल्यांचे महिला वर्गांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
शासनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे बक्षिस घेत असून,गावातील विविध समस्या मात्र दुर्लक्ष्य करीत असल्यामुळे येथिल ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.गावात नळ योजना असून पाणी दोन,चार दिवसांतून एकदाच मिळत असून ते सुद्धा मुबलक प्रमाणात मिळत नाही,नाईलाजाने महिला वर्गांस डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे.गेले पाण्यांची व रस्त्याची बिकट अवस्था असल्यामुळे वयोवृद्ध शाळकरी मुले यांस नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मात्र असे तरी सुद्धा ग्रूप ग्राम पंचयात विकास कामात पुढे मात्र समस्या दारोदारी आशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
सरपंच पदाचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला असून सध्या प्रशासकीय स्वरुपात कारभार सुरु असून,मात्र निवडणूका तोंडावर आल्यानंतर आम्ही विकास कामे करु? मात्र प्रत्यक्षात मतदार राज्यांचा अपेक्षा भंग होत असल्यांचे पहावयास मिळत आहे.यामुळे येथिल ग्रामस्थ तिव्र नाराजी व्यक्त करीत आहे.समस्या निर्माण होत असून त्या फक्त पाहण्यांची भुमिका ग्रूप ग्राम पंचायत करीत असून मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यांत अपयशी ठरत आहे.विषेश म्हणजे पाण्यासाठी महिला वर्गासमवेत पुरुषांना देखिल महिला वर्गांस पाणी भरण्यांस मदत करावी लागत असल्यामुळे केव्हा अच्छे दिन येणार हाच विचार येथिल ग्रामस्थ करीत आहेत.
चौकट -
वडगावातील परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देणार असून लवकरच येथील ग्रामस्थांच्या प्रश्नाचे समाधान होईल अशी व्यवस्था केली जाईल.
___ संदीप कराड
गटविकास अधिकारी, खालापूर
चौकट
एमआयडीसी च्या माध्यमातून पाणी येत असतांना कधी कमी जास्त होते.मात्र मी प्रत्येक्षात जावून त्यांची माहिती घेतो.शिवाय या ठिकाणी अनाधिकृत असलेले कनेक्शन आपण बंद केले असून,नविन लाईन टाकण्यांचे काम सुरु आहे.
ग्रामसेवक वडगांव : सुहास वारे
चौकट
खालापूर तालुक्यातील नावरुपाला असलेली ग्रूप ग्राम पंचायंत मात्र महिलावर्गांना पाण्यासाठी वणवण भिरावे लागत आहे.गावामध्ये नळ योजना असूनही पाणी मिळत नाही.यासाठी ग्रामपंचायत ला अर्ज देवूनही दखल घेतली जात नाही.यासाठी आम्हाला डोक्यावरुन पाणी आणावे लागते.मात्र आमच्या डोक्यावरील हंडा केव्हा उतरणार
वडगाव महिला : सुरेखा गडगे )
0 Comments