उरण बस स्टॅन्डवर बसच नाहीत,प्रवाशांचे प्रचंड हाल,लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम असल्याने बसचा तुटवडा, कॉग्रेसचे नेते दिपक यांचा आरोप

 उरण बस स्टॅन्डवर बसच नाहीत,प्रवाशांचे प्रचंड हाल,लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम असल्याने बसचा तुटवडा, कॉग्रेसचे नेते दिपक यांचा आरोप




पाताळगंगा :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ९ ऑक्टोबर,

             उरण बस स्टॅन्ड वर आज सकाळी एसटी महामंडळाच्या बस नसल्याने प्रवाशी आणि शालेय मुलांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे , आज सरकारचा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मोर्बा,माणगाव येथे असल्याने सर्व बस तिकडे पाठवल्याचा आरोप कॉग्रेसचे  झोपडपट्टी व चाळी विकाससेलचे अध्यक्ष दिपक शंकर पाटील यांनी आणि कॉग्रेस उरण महिला आघाडी अध्यक्षा रेखा घरत यांनी केला आहे, 
               

  आज सकाळी उरण बस स्टॅन्ड वर नेहमीप्रमाणे प्रवासी आणि शालेय विद्यार्थी यांची गर्दी झाली होती.मात्र बस स्टॅन्ड वर एकच बस असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून  प्रवाशानी एसटी महांडळाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा सरकारी कार्यक्रम असला तरी सामान्य नागरिकांना त्रास होईल असे वागू नये अन्यथा कॉग्रेसच्या वतीने एसटी महामंडळाविरोधात   तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉग्रेसचे नेते दिपक यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन