युवा सेनेची आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी जोरदार फिल्डिंग
तुतारी घेतली तरी तुणतुणं वाजविण्याची वेळ येणार ..... रोहित विचारे
पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : ५ ऑक्टोबर,
आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी करोडो रूपयांचा विकास निधी मिळवून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विकासाला गती मिळवून दिली आहे.त्यांना पुन्हा आमदार करायचे असे जनतेनी ठरविले आहे.ते कधीच मीच आमदार असावा असे बोलत नाहीत परंतु काहींना आमदारकीची स्वप्न झोप लागून देत नाहीत ते आज घड्याळात तर उद्या तुतारीत जाऊन आमदार होण्याची स्वप्न पाहत आहेत.त्यांना या विधानसभा क्षेत्रातील सुज्ञ मतदार राजा तुणतुणं वाजवायला लावल्याशिवाय ठेवणार नसल्याचे खालापूर तालुका युवा सेनेचे तालुका अधिकारी रोहित विचारे यांनी सुधाकर घारे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी कर्जत विधानसभा मतदारसंघात राजकीय घमासान पहायला मिळत आहे.विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासकामांचा धडाका लावल्याने महायुतीचे तिकीट त्यांनाच मिळणार असल्याने युतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांनी आता आपला राजकीय प्रवास घड्याळातून मार्ग बदलून तुतारी कडे जाण्याचा निश्चित केला आहे.मात्र तुतारी ज्या महाआघाडीचा घटकपक्ष आहे तेथूनही येथील जागेवर शिवसेना (उबाठा) गटाचा हक्क आहे आणि तसे शिवसेनेनी यापूर्वीच जाहीर करून आपला उमेदवार ठरविला आहे.
असे असतांना सुधाकर घारे यांना महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूकीचे तिकीट मिळणे कठीण आहे.परंतु मी म्हणेन ती पूर्व दिशा असे संबोधणाऱ्या सुधाकर घारे यांना आपणासी तिकीट मिळेल असे वाटत असले. तरी या मतदारसंघात आयत्यावेळी तिकीट मिळविणाऱ्या चे यापूर्वी काय झाले आहे याचा इतिहास माहीत नसावा असेच वाटत आहे.त्यामुळे त्यांनी तुतारी हाती घेतली काय आणि अपक्ष राहिले काय त्यांचा कोणताच परिणाम शिवसेना महायुतीचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यावर होणार नाही,उलट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी केलेल्या विकासकामांची पोच पावती देण्यासाठी मतदार राजा सज्ज झाला असल्याचे मत युवासेना खालापूर तालुका अधिकारी रोहित विचारे यांनी सांगितले आहे.
0 Comments