लायन्स क्लब खालापूर यांच्या मार्फत खालापूर पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ७ ऑक्टोबर,
लायन्स क्लब सातत्याने विविध उपक्रम राबवित असतांना सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचे काम सुद्धा करीत आहे.सर्व सामान्य जनतेच्या सदैव रक्षणांसाठी तत्पर असलेले खालापूर पोलीस स्टेशन चे कर्मचारी,अधिकारी यांच्यासाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यांत आले.यावेळी सर्व पोलीस कर्मचारी व उपस्थित पोलीस पाटील मित्र यांची शुगर लेवल,ब्लड ,हाडांची तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली.
या शिबिरात शेकडो हून पोलीस अधिकारी,कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई डॉ.सना खान व टीम व नायर आय हॉस्पिटल पनवेल विश्वजीत पोणोली व टीम यांच्या माध्यमातून करण्यांत आली.यावेळी लायन्स क्लब खालापूर तर्फे पेन भेट देऊन सन्मान करण्यात आला.
सदर आरोग्य शिबिरात उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार,बीडीओ -कऱ्हाड,पोलीस निरीक्षक रसायनी - संजय बांगर,पोलीस निरीक्षक खोपोली - शितल राऊत,पोलीस निरीक्षक -मनिष मोरे,पोलीस निरीक्षक - संतोष आवटी,तसेच खालापूर, खोपोली वावोशी, रसायनी, चौक व पोलीस पाटील संघटना मित्र उपस्थित होते.तपासणी करण्यांत आली.
हा उपक्रम लायन्स अध्यक्ष- शिवानी ताई जंगम,खजिनदार - किशोर पाटील,प्रथम उपाध्यक्ष - लहू भोईर,द्वितीय उपाध्यक्ष - भरत पाटील,
हरिभाऊ जाधव,महेंद्र सावंत,अशोक पाटील,विक्रम साबळे,व ऋषी चाळके उपस्थित होते.या आरोग्य शिबीरांचे प्रोजेक्ट हेड म्हाणून लायन भरत पाटील किशोर पाटील व हरिभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना खाली करण्यांत आली.
0 Comments