कुंभीवली गावात दहशत पसरलेल्या नागाला अखेर जेरबंद
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
कुंभीवली : ८ ऑक्टोबर,
खालापूर तालुक्यातील कुंभीवली गावामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामस्थांच्या मध्ये भिताचे वातावरण निर्माण करणारा,तसेच सोळा वर्षाच्या मुलगा अर्जुन राठोड यांचा मृत्यू हा नाग चावल्यामुळे झाला असा प्राथमिक अंदाज येथिल ग्रामस्थांनी लावला,मात्र त्यांस हॉस्पिटल मध्ये घेवून जात असतांना त्यांची प्राणज्योत मावळली,यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.अखेर जयराम गायकवाड यांच्या निदर्शनास आल्याने गणेश पाटील यांनी सर्पमित्र अमोल ठकेकर यांस बोलवून अखेर त्या नागास जेरबंद केले व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
निसर्गाचा -हास होत असतांना जंगलातील सरपटणा-या मुक्या प्राण्यांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला असून या पासून त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत चालला आहे.सरपटणारे प्राणी हे रस्ता क्रॉस करीत असतांना अपघाती मृत्यू होत असल्यांचे निदर्शनास येत आहे.काही मनुष्य वस्तीत आल्यामुळे त्यांच्या जिवाला तसेच येथे राहणारे ग्रामस्थ यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.
कुंभीवली येथिल ग्रामस्थ अनेक दिवस या नागाच्या भितीमुळे भयभीत झाले होते.मात्र सर्पमित्र ठकेकर यांनी मोठ्या हुशारीने घरामधून या नागास जेरबंद केले.तसेच जंगालत सोडून दिले.
चौकट
कुंभीवली गावामध्ये अनेक दिवस या नागामुळे शांत झोप लागत नव्हती तसेच १६ वर्षीय मुलाचा मृत्यू नाग चावल्यामुळे झाल होता अखेर सर्पमित्र यांनी त्यांस पकडल्यामुळे आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आहे
ग्रामस्थ, कुंभीवली : गणेश पेरणेकर
0 Comments