शासनमान्य जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा२०२४-२५ खोपोली येथे संपन्न
पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : ९ ऑक्टोबर,
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा कारमेल कॉन्व्हेंट स्कूल - खोपोली येथे संपन्न झाली आहे. या स्पर्धेत १५ तालुक्यातील ३५० हून अधिक कुस्तीपटूनी सहभाग घेऊन विभागीय स्तरांवर आपली निवड व्हावी या उद्देशाने आपले कौशल्य पणाला लावले. ७ सप्टेंबर २०२४ रोजी मुलांच्या तर दुसऱ्या दिवशी मुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभा समयी खोपोलीतील युवा उधोजक विक्रम यशवंत साबळे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष अंकित साखरे, खजिनदार जितेंद्र सकपाळ, सदस्य गुरुनाथ साठेलकर, गटशिक्षणाधिकारी कैलास चोरमाले, कुस्तीपटू विजयेंद्र सिंग, भूषण पाटील, संजय शिर्के, खोपोली शहरातील विवीध शाळांच्या मुख्याध्यापिकां मध्ये सिस्टर निर्मल मारिया, झानशी ऑगस्टीन, विद्या अयप्पन, निशिगंधा तुरे, सीमा तिवारी, सीमा नाईक इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, तालुका समनव्यक जगदीश मरागजे, क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार, समीर शिंदे, अमित विचारे, जयश्री नेमाणे यांनी खूप मेहनत घेतली. स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच, चंद्रकांत मोहोळ, निलेश मारणे, राजीवडे, सावळेराम पायमोडे, विजय चव्हाण, रोशनी परदेशी, दिवेश पलांडे, ओंकार निंबळे, जयेश खरमारे, यांनी मोलाची कामगिरी बजावली.
खोपोली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक तथा राष्ट्रीयस्तरावर किर्तीमान प्रस्थापित केलेल्या रोप मल्लखांब खेळाडू पूजा चव्हाण यांच्या हस्ते विविध वय आणि वजनी गटातील विजेत्या कुस्तीगिरांना पदक व शासनाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील विजयी खेळाडू मुंबई विभागीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांवर विविध स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments