हाकेला धावणारी, नवसाला पावणारी खालापूरची ग्रामदेवता आई साबाई माता
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ८ ऑक्टोबर,
वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार खालापूरची ग्रामदेवता आई साबाई माता मंदिरात ह्या वर्षीही नवरात्र उत्सव व साबाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत असतो.आई साबाई मातेचे मूळस्थान मुंबई पुणे हायेवलगत ढापनि गडावर आहे दरवर्षी हनुमान जयंतीला साबाई मातेच मूलस्थान असलेल्या ढापनि गडावर खालापूर ग्रामस्थ जात असतात नवरात्रीच्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात केले जाते
ह्या मध्ये दररोज रात्री भजन केले जाते त्याचबरोबर सप्तमीला रात्री बारा वाजता साबाई मातेची महाआरती केली जाते ,तसेच अष्टमीला मंदिरात नवचंडी होम केले जाते पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी मामलेदार (तहसीलदार )यांच्या हस्ते मंदिरात आपट्याची पाने रचून त्याची पूजा केली जाते ,मामलेदार (तहसीलदार )यांनी आपट्याच्या पाने ह्याची पूजा झाल्यानंतर सोने लुटालुटीचा कार्यक्रम होत असतो .हे सोने लुटल्यांतर प्रथम ते सोन देवीला अर्पण करून नंतर एकमेकांना देत असतात.
दसऱ्याच्या दिवशी रात्री संपूर्ण गावात पालखीचे जागोजागी ग्रामस्थ स्वागत करतात व भक्तिभावाने दर्शन घेत असतात .नववधू व माहेरपणाला आलेली लेक देवीची ओटी भरूनच गावाची वेस ओलांडत असतात. नवरात्रमध्ये खालापूर गाव व पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक भक्त देवीची ओटी भरण्यासाठी आई साबाई मंदिरात येत असतात.
हा सोहळा साजरा करण्यासाठी संपुर्ण खालापूर शहरातील ग्रामस्थ मेहनत घेत असतात.
नित्यनियमितपणे देवीची रोजची पूजा अर्चा देवीचे पुजारी राजू शशिकांत देसाई व त्यांच्या मातोश्री ग. भा. सरिता शशिकांत देसाई करत असतात.तर नित्यनियमित पणे त्यांना मदत म्हणून दिपक जगताप सहकार्य करत असतात.
0 Comments