खोपोली,खालापूर,कर्जत येथे HSRP सेंटर साठी खोपोली खालापूर संघर्ष समितीची मागणी..

 खोपोली,खालापूर,कर्जत येथे HSRP सेंटर साठी  खोपोली खालापूर संघर्ष समितीची मागणी..


नागरिकांच्या मागण्या लक्षात घेता कळंबोली येथील RTO अधिकारी यांना देण्यात आले निवेदन...

शहरी व ग्रामीण भागात याबाबत खोपोली,खालापूर संघर्ष समिती करणार जनजागृती..




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : ३ मार्च,

                महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एच.एस.आर.पी.) बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत.१  एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबर प्लेट आहेत.त्यामुळे ३१  मार्च २०१९ पर्यंत सदर नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना ३१  मार्च २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा RTO कडून दंड आकारण्यात येईल असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आलेला आहे.१  एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत वाहनांवर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आधीच बसविण्यात आलेली आहे.त्यामुळे या वाहनांना बसवण्याची गरज नाही.नंबर प्लेटसाठी खोपोली, खालापूर,कर्जत याठिकाणी सेंटर दयावे अथवा यासाठी खोपोली, खालापूर, कर्जत येथे कॅम्प आयोजित करून सदर नंबर प्लेट बसविण्याची सुविधा करून देण्यांसाठी सदर निवेदन देण्यांत आले.
            १  एप्रिल २०१९  नंतर च्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविलेल्या आहेत.या विशेष प्रकारच्या अल्युमिनियम पासून बनलेल्या असून त्यावर परावर्तित रंग आणि युनिक आयडेंटीफिकेशन कोड असतो.या प्लेट्स सीसीटीव्ही कॅमेराद्वारा सहज ओळखल्या जाऊ शकतात. त्यामुळे वाहन चोरी आणि बनावटगिरी रोखण्यास मदत होते.असे प्रादेशिक परिवहन शाखेचे म्हणणे आहे.या नवीन नंबर प्लेट साठी दुचाकी आणि ट्रॅक्टर साठी ४५०  रुपये व GST कर,तीन चाकी वाहनासाठी ५००  रुपये व GST कर, तसेच चार चाकी गाडीसाठी ७४५  रुपये व GST कर आकारण्यात येणार आहे.शासनाने नियुक्त केलेल्या अधिकृत फीटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट घेऊन अधिकृत विक्रेत्याकडूनच एच.एस.आर.पी.नंबर प्लेट घ्यावी असे परिवहन शाखेने सुचवलेले आहे.
               सदर फिटमेंट सेंटर निश्चित करताना शासनाने नागरिकांना सोयीचे होईल असे ठिकाण देणे अत्यंत गरजेचे आहे.कर्जत खालापूर तालुक्यासाठी पनवेल सेंटर निश्चित केले आहे.खोपोली,खालापूर,कर्जत येथील असंख्य वाहनांना यासाठी स्वतःची गाडी घेऊन पनवेल येथे जावे लागणार आहे.त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक, मानसिक,शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे.विशेषतः महिला वर्ग दुचाकी धारकांना सदर गाडी घेऊन जाणे जिकरीचे ठरणार आहे.यातून होणाऱ्या मानसिक त्रासासोबत अपघात होण्याचे व जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
                 खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून RTO विभागास विनंती करण्यात आलेली आहे. की सदर नंबर प्लेटसाठी खोपोली, खालापूर,कर्जत याठिकाणी सेंटर दयावे अथवा यासाठी खोपोली, खालापूर, कर्जत येथे कॅम्प आयोजित करून सदर नंबर प्लेट बसविण्याची सुविधा करून दयावी जेणेकरून नागरिकांना सोयीचे होईल.या मागणीचा विचार करून RTO ने नागरिकांना सहकार्य करावे.योग्य ती जनजागृती करावी. लाखोंच्या वरती असणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता यास मुदतवाढ द्यावी तसेच स्थानिक ठिकाणी कॅम्प करण्याची सुविधा दयावी अथवा काही सेंटर्स उपलब्ध करून द्यावे अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने डॉ.शेखर जांभळे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments

सुकीवली जिल्हा परिषद गटातून प्रशांत आखाडे