ग्रुप ग्रामपंचायत चौक शिवस्मारकाचे काम मार्गी लावण्यास टाळाटाळ

 सात महिन्यापुर्वी ग्रामस्थांचा बहुमताने ठराव,छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे,

 ,ग्रुप ग्रामपंचायत चौक  शिवस्मारकाचे काम मार्गी लावण्यास टाळाटाळ


माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक  : १९  सप्टेंबर 

          ऐतिहासिक वारसा लाभलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे चौक हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आश्या या ठिकाणी गेले अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक या चौक या ठिकाणी नाही ही शोकांतिका आहे.हे स्मारक व्हावे ही समस्त चौक ग्रामस्थांची ईच्छा असून,या कडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.या संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत चौक येथे सात महिन्यापुर्वी दगडी शाळा, चौक जवळील मोकळ्या जागेत भव्य असे शिवस्मारक बांधण्याचा ठराव ग्रामस्थांचा बहुमताने घेण्यांत आला.मात्र अनेक महिने होवूनही कोणतीच हालचाल नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील सोनटक्के यांनी नाराजी व्यक्त केली.
           चौक या बाजारपेठेला ला लाभलेला इतिहास आज संपुर्ण महाराष्ट्रात प्रचलित असून,ज्या राजांने रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले.आज प्रत्येक खेडोपाडी किंवा शहरात तसेच विदेशात ही महाराजांचे स्मारक पहावयांस मिळत आहे.मात्र चौक या परिसरात गेले अनेक वर्ष शिव स्मारक नसल्यांची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.ज्या राज्यांने आपले उभे आयुष्य रयतेच्या सुख - दुखासाठी वेचले आश्या या राजाचं स्मारक आवश्यक आहे.यासाठी जागा ही निच्शित करण्यांत आली असून,  या कडे का दुर्लक्ष होते.असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.
          छत्रपती शिवाजी महाराज या परिसरातून वहिवाट करत असत असे  इतिहासकालीन कागदपत्रात पुरावे आढळतात.त्याच बरोबर चौक ग्रामस्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतानाही व तसा ठराव तब्बल ७ महिन्यांपूर्वी  मंजूर करून देखील चौक ग्रामपंचायत या स्मारकाचा विसर पडला की काय ?अशी चर्चा ऐकण्यांस मिळत आहे.स्मारकांचे काम मार्गी लावले जात नसून,या संदर्भात ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहे. 

               ----------------चौकट ----------------
चौक ग्रामपंचायत सरपंच रितू सुधीर ठोंबरे यांच्या उपस्थित फेब्रुवारी २०२५ मध्ये संपन्न झालेल्या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी बहुमताने दगडी शाळा,चौक जवळील मोकळ्या जागेत भव्य असे शिवस्मारक बांधण्याचा ठराव मंजूर करण्यांत आला.मात्र या स्मारकासाठी सरपंच यांच्या कडून निष्काळजीपणा होत  आहे.सदर वरिष्ठ स्तरावर या विषयाचा पाठपुरावा करून आवाज उठविणार  

सामाजिक कार्यकर्ते चौक -  स्वप्नील युवराज सोनटक्के 

Post a Comment

0 Comments

माजगावच्या स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता झाला सुखमय,अनेक वर्षाचा खड्डेमय प्रवासाला पुर्ण विराम!