राज्यस्तरीय सह्याद्रिरत्न डॉ.महेश निमणे या पुरस्कारांने सन्मानित,
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : 15 डिसेंबर,
नुकताच पाल्मिस्ट दिल्ली या नामांकित संस्थेतून पीएचडी पदवीने सन्मानित केलेले डॉ.महेश निमणे यांस पुणे येथे टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य आयोजित सह्याद्रिरत्न हा पुरस्कार पत्रकार भवन, नवीपेठ पुणे येथे सन्मानित करण्यांत आले.सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, श्रीफळ अश्या या पुरस्कारांचे स्वरूप होते.गेले अनेक वर्ष खोपोली येथे सुखी वास्तु स्पिरिचुअल सर्व्हिसेस च्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करीत असून या वास्तू शास्त्राचा हजारो व्यक्तींना उत्तम लाभ ही झाला.गुढ विज्ञान या क्षेत्रात वास्तुशास्र,अंकशास्त्र, रेकी,लोलक शास्त्र,यात प्राविण्य मिळवलेले व्यक्तिमत्व, म्हणून ओळखले जात आहे.
आजवर निमणे त्यांस खोपोली पद्मश्री, पुरस्कार,पुणे उद्योग भूषण,टाइकून्स ऑफ़ महाराष्ट्र, नाशिक,वास्तु श्री पुरस्कार, संभाजी नगर,) प्रो पाल्मिस्ट दिल्ली ,विद्यास्पति, वृंदावन उत्तर प्रदेश आदि पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. तसेच त्यांनी केलेले मार्गदर्शन अनेकांसाठी लाभदायक ठरले आहे.
पत्रकार भवन, नवीपेठ पुणे येथे झालेल्या या सह्याद्रिरत्न या पुरस्कारांच्या वेळी संस्थापक अध्यक्ष, टॅलेंट कट्टा-डॉ. दिपक जाधव,प्रसिद्ध सिनेअभिनेते चांडाळ चौकडीच्या बारामती फेम --भरत (बाळासाहेब) शिंदे,अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ --प्रा. डॉ. संदीप सांगळे,प्रसिद्ध शास्त्रज्ञ (विशेष कार्यः कृत्रिम पावसावर संशोधन -- डॉ. नीता जोशी,देऊळ बंद मराठी चित्रपटातील छोटीशी चिमुकली (अभिनेत्री)-- आर्या घारे,संस्थापक: सॉलिट्यूड हॉलिडे प्रदेश उपाद्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग-- डॉ. नितीन धवणे-पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.


0 Comments