खालापूर येथिल शिक्षक व केंद्रप्रमुख यांची शाळेला दांडी,शिक्षण परिषदेचे परिपत्रक नाही,शिक्षण परिषदेच्या नावाने गुरुजी माथेरान पर्यटक स्थळी
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माथेरान : 27 डिसेंबर,
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषेद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे व काही शाळेवर आसणारे केंद्रप्रमुख यांनी माथेरान येथे एक दिवशीय राजिप शाळा हशाची पट्टी माथेरान येथे संयुक्त शिक्षण परिषद घेण्यांत आली होती.यावेळी 80 ते 85 शिक्षक या परिषदेला उपस्थित राहण्यांची परवानगी गट शिक्षणाधिकारी यांनी दिली होती.मात्र काही शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे पारिपत्रक नसतानाही खालापूर तालुक्यातील केंद्र प्रमुख आणी शिक्षक उपस्थित राहिल्यामुळे एकच चर्चेला उधान आले आहे.
शिक्षण परिषद ही निसर्ग रम्य वातावरण असलेले थंड हवेचे ठिकाण माथेरान येथील रायगड जिल्हा परिषद शाळा हाशाची पट्टी ह्या शाळेत घेण्यांत आली डोंगराळ भागात असून साधारण दोन अडीच तास प्रवास तोही पायी प्रवास करून जावे लागते.तीव्र उतार, अश्या स्वरूपाचा मार्ग असून शाळेत जाण्यासाठी मोठीं कसरत करावी लागते.मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडवून आणी शाळेला दांडी मारून शिक्षक व केंद्रप्रमुख माथेरानचा आनंद लुटण्यासाठी गेल्यामुळे काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
खालापूर तालुक्यातील वावर्ले व जांबरुंग केंद्रांनी ही शिक्षण परिषद आयोजित करण्यांत आली.मात्र कोणतेहीं निमंत्रण, नसतानाही खालापूर,आत्कारगाव,का रगाव,कलोते,ठाकुर वाडी,वणवे -निंबोडे येथिल शिक्षक येथे कार्यक्रमास गेले होते.
------------ चौकट-----------
माथेरान राजिप शाळा हशाची पट्टी येथे सयुक्त शिक्षक परिषद ठेवण्यात आली होती.मात्र काही शिक्षकांना निमंत्रण होते की नव्हते हे तपासले जाईल किंवा ते रजा टाकून गेले होते का,शाळेला सुट्टी घेऊून गेले होते का ?त्याच बरोबर केंद्र प्रमुख गेले असतील तर ठीक आहे.तसेच यापुढे प्रत्येक शिक्षकाला समस दिली जाईल.आणी सोमवारी चौकशी करण्यांत येईल,त्याच बरोबर शिक्षण परिषद त्याच तालुक्यात घेण्यांत येईल.
गट शिक्षणााधिकारी : खालापूर दीपा परब

0 Comments