पिल्लई कॉलेज यांचा स्तुत्य उपक्रम

 पिल्लई कॉलेज यांचा स्तुत्य उपक्रम,रस्ता सुरक्षा ,पथनाट्य, रॅली काढून पर्यावरण वाचविण्याचा संदेश,आर्ट्स कॉमर्स व  सायन्स विद्यार्थ्यांच्या पुढाकार

 


माय मराठी न्युज : वृत्तसेवा                                       खालापूर : 27 डिसेंबर 


        पिल्लई एच.ओ.सी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी एन.एस.एस च्या माध्यमातून गेले सात दिवस ग्रुप ग्राम पंचायत माजगाव या परिसरात वास्तव्ये करून समाज प्रबोधनाचे काम करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण केली.यावेळी प्लास्टिकविरोधी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचा मुख्य उद्देश लोकांमध्ये प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले.
          यावेळी प्लास्टिक किती घातक आणि त्यांचे दुष्परिणाम याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.त्याच बरोबर आदिवासी वाडी येथे ब्लँकेट वाटप, स्वच्छ भारत अभियानावर पथनाट्य सादर करण्यात आले.राजिप शाळेच्या शाळेच्या भिंतीवर चित्रकलेनी,या भिंती रंगविण्यात आल्या.रक्तदान हे सर्वात मोठे दान असून रक्तदान शिबिर व भव्य वैद्यकीय तपासणी विठ्ठल मंदिर माजगाव येथे आयोजित करण्यात आली.यावेळी वृक्ष लागवड,दारूचे दुष्परिणाम,जलप्रदूषण, मृदासंवर्धन आणि मृदाप्रदूषण,प्राण्यांना होणारी हानी व मानवी आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम गेले सात दिवस या परिसरातील ग्रामस्थांना हे विद्यार्थी सातत्याने मार्गदर्शन करत होते.
       या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, कार्यक्रम अधिकारी कलावती उपाध्ये यांनी पाहिले. एनएसएस लीडर अवधूत कडू, भूमिक गोलप, स्मृती वेदांती, साहिल ,सुजल तसेच विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच, सदस्य आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       


 

Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज