सुनिता हरिश्चंद्र लभडे ह्यांचे अल्पशा आजाराने निधन

 सुनिता हरिश्चंद्र लभडे ह्यांचे अल्पशा आजाराने निधन 

माय मराठी न्युज : वृत्तसेवा   
वारद  : २ जानेवारी,





             खालापूर तालुक्यातील वारद गावात राहणारी वै.ह.भ.प. सुनिता हरिश्चंद्र लभडे यांचे राहत्या घरी गुरुवार दि. २५  डिसेंबर,रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.त्या वयाच्या ६० वर्षाचे होते.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                                    त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.                         त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.३ जानेवारी रोजी श्री  क्षेत्र धाकटी पंढरी (ताकई) साजगांव येथे होणार आहे.तसेच सायंकाळी शनिवार दि.३ जानेवारी रोजी सायंकाळी ०६ ते ०७ वा. ह.भ.प. चैतन्य आनंद खंडागळे महाराज (चौक) यांचे प्रवचन होईल.तसेच मंगळवार दि.६  जानेवारी रोजी सायंकाळी ०६ ते ०७ वा. ह.भ.प. संदिप महाराज यादव महाराज (आसरेवाडी) यांचे प्रवचन होईल.
         त्यांचे उत्तरकार्य बुधवार ७ जानेवारी रोजी वारद येथे त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प.रामदास महाराज पाटील खोपोली( गुरुकुल संस्था महड ) यांचे सकाळी १० : ३० वाजता प्रवचन होणारा आहे.
           त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, मनोज हरिश्चंद्र लभडे मुली,बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज